Home >> गोवा >> आरोग्य खात्याच्या माजी संचालक डॉ. वंदना धुमे यांचे निधन

आरोग्य खात्याच्या माजी संचालक डॉ. वंदना धुमे यांचे निधन

आज सांतईनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
आरोग्य खात्याच्या माजी संचालक डॉ. वंदना धुमे यांचे निधन

पणजी :  गोवा आरोग्य खात्याच्या माजी संचालक डॉ. वंदना धुमे यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आरोग्य विभागासह वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. धुमे या आपल्या नम्र, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाच्या होत्या. आरोग्य खात्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा बजावली. त्यांच्या कार्याचा ठसा सहकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिकांच्या मनात कायम राहील.

त्यांच्या निधनाबद्दल आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. वंदना धुमे यांच्यावर आज सायंकाळी सांतईनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.