Home >> गोवा >> वालंकिणीत गोमंतकींयांसाठी ‘गोवा निवास’ उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद : गिरीश चोडणकर

वालंकिणीत गोमंतकींयांसाठी ‘गोवा निवास’ उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद : गिरीश चोडणकर

तामीळनाडूचे मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांकडे चोडणकर यांची चर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 hours ago
वालंकिणीत गोमंतकींयांसाठी ‘गोवा निवास’ उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद : गिरीश चोडणकर

पणजी : वालंकिणीला जाणाऱ्या गोमंतकींयांसाठी  'गोवा निवास' उभारण्याच्या दीर्घकालीन मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा विषय तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ (Vijay Joseph)  व पर्यटन मंत्र्यांकडे मांडल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

यासंदर्भात माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय अधिक मजबूत करणे व समान किमान कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गिरीश चोडणकर यांनी हा विषय मुख्यमंत्री जोसेफ व काँग्रेसचे आमदार तथा पर्यटन मंत्री राजेश कुमार (Rajesh Kumar) यांच्याकडे मांडला. 

वालंकिणी येथे भेट देणाऱ्या गोमंतकीयांच्या सोयीसाठी 'गोवा निवास' उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटन मंत्री राजेश कुमार यांना या प्रकल्पासाठी योग्य जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. 

याशिवाय, 'गोवा निवास' प्रत्यक्षात उभा होईपर्यंत गोमंतकीय भाविकांना तामिळनाडू पर्यटन विभागामार्फत निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याते चोडणकर म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा