Home >> गोवा >> ज्येष्ठ साहित्य‌िक, नाटककार पुंडलीक नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ साहित्य‌िक, नाटककार पुंडलीक नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
31 mins ago
ज्येष्ठ साहित्य‌िक, नाटककार पुंडलीक नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पणजी : कला अकादमीतर्फे (Kala Academy Goa) आयोजित करण्यात आलेल्या कोकणी राज्य नाट्य महोत्सवानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि कोकणी रंगभूमीचे मान्यवर व्यक्तिमत्त्व पुंडलीक नाईक (Pundalik Naik) यांना यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पणजीतील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार भेटवण्यात येणार आहे. कोकणी साहित्य आणि नाट्यलेखन क्षेत्रातील पुंडलीक नाईक यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. 

कोकणी भाषा, साहित्य आणि नाट्य चळवळीला समृद्ध करणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमातून होणार आहे. या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा