
साहित्य:
२ वाट्या शिजलेला भात/ उरलेला भात
एक बारीक चमचा मोहरी
२ बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो
१ बारीक चमचा जिरे
हिंग चिमूटभर
१ बारीक चमचा हळद
६ ते ७ कढीपत्त्याची पाने
२ मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ बारीक वाटी किसलेले खोबरं
कृती:
एका कढईत तेल गरम करा. मग त्यात मोहरी घाला. ती तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि हळद घालून छान परतून घ्या. आता यात कांदा, टोमॅटो घालून कांदा मऊ होईपर्यंत परतवा. आता शिजलेला भात/उरलेला भात आणि मीठ घाला. ३ ते ४ मिनटे हे सगळं परतवा. वरून कोथिंबीर व किसलेले खोबरे घाला.

संचिता केळकर