Home >> गोवा >> कुडचडेतील लैंगिक अत्याचारप्रकरण; सोहम नाईकविरुद्ध पाचवे आरोपपत्र दाखल

कुडचडेतील लैंगिक अत्याचारप्रकरण; सोहम नाईकविरुद्ध पाचवे आरोपपत्र दाखल

क्राईम ब्रांचने केपे प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले आरोपपत्र

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th June, 01:15 pm
कुडचडेतील लैंगिक अत्याचारप्रकरण; सोहम नाईकविरुद्ध पाचवे आरोपपत्र दाखल

पणजी : कुडचडेतील लैंगिक (Curchorem sexual abuse)  अत्याचारप्रकरणी क्राईम ब्रांचने (Crime Branch, Goa) संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयात पाचवे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणात एकूण २७ साक्षीदार असून, १७६ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. आता पर्यंत पुढे आलेल्या पाचही प्रकरणात संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत.  त्यातील चार गुन्हे पीडितांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन गुन्हे कुडचडे पोलिसांनी दाखल करून गुन्हा शाखेकडे वर्ग केले. यातील एका पीडितेवर १४ वर्षांची असताना लैंगिक अत्याचार झाला होता.

दुसऱ्या पीडितेला लैंगिक छळ करून धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी तपास पूर्ण करून केपे प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणातील संशयित सोहम नाईक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.