मडगाव येथे जंक्शनवरील ब्लॉकमुळे कोकण रेल्वे सेवांमध्ये बदल; जनशताब्दी अंशतः रद्द

प्रवाशांनी वेळापत्रकाची खातरजमा करून प्रवास करावा : कोकण रेल्वे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
मडगाव येथे जंक्शनवरील ब्लॉकमुळे कोकण रेल्वे सेवांमध्ये बदल; जनशताब्दी अंशतः रद्द

पणजी : मडगाव येथे जंक्शन वर आज सोमवारी महत्त्वाच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेने काही रेल्वे सेवांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. या ब्लॉकचा परिणाम विशेषतः मडगाव–मंगळुरू मार्गावरील प्रवाशांवर होणार आहे.

कोकण रेल्वेकडून मडगाव–मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या दोन मेमू (MEMU) सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी दोन गाड्या काणकोणपर्यंतच चालवण्यात येणार असून, संबंधित मार्गांवरील काही विभागांमध्ये सेवा अंशतः रद्द राहणार आहेत.

दरम्यान, जनशताब्दी एक्सप्रेस सेवांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मुंबई–मडगाव जनशताब्दी (गाडी क्र. 12051) ही गाडी मडगावपर्यंत न जाता थिवीमपर्यंतच धावणार आहे. तर मडगाव–मुंबई जनशताब्दी (गाडी क्र. 12052) ही गाडी थिवीहून सुटणार असून, थिवीम–मडगाव या दरम्यानची सेवा अंशतः रद्द राहणार आहे.

वेळापत्रकाची खातरजमा करून प्रवास करावा 

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांच्या वेळापत्रकाची खातरजमा करूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा