'माझे घर योजने'अंतर्गत उद्या पणजीत १ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना सनद वितरण

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी विशेष पत्रकार परिषदेत दिली महत्त्वपूर्ण माहिती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
'माझे घर योजने'अंतर्गत उद्या पणजीत १ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना सनद वितरण

पणजी : गोवा सरकारच्या 'माझे घर योजने'अंतर्गत (Mhaje Ghar Yojana) उत्तर गोवा जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक पात्र लाभार्थ्यांना उद्या, ९ जून रोजी अधिकृत आदेश आणि सनदांचे वितरण केले जाणार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आज एका विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार असून, या सनद वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध मतदारसंघांचे आमदार, मंत्री, उप-जिल्हाधिकारी आणि मामलेदार उपस्थित राहणार आहेत.



१ हजारांहून अधिक अर्ज वेळेत हातावेगळे

पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी सांगितले कि, 'माझे घर योजने'च्या विविध घटकांनुसार आणि वेगवेगळ्या तालुक्यांमधून आलेल्या अर्जांची सखोल छाननी करण्यात आली आहे. आतापर्यंत उत्तर गोव्यातील १,००० हून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांच्या सनदा तयार करण्यात आल्या आहेत. उद्या होणाऱ्या मुख्य कार्यक्रमानंतर, जिल्ह्यातील उर्वरित पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये विशेष शिबिरे (Camps) आयोजित केली जातील.


माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत Goa Marathi News |  mhaje ghar yojana is a big improvement said cm pramod sawant | Latest Goa  News at Lokmat.com


साप्ताहिक पातळीवर घेतला जातोय आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या योजनेच्या प्रगतीचा स्वतः आढावा घेतला असून, जिल्हाधिकारी स्तरावर देखील दर आठवड्याला (Weekly Basis) या कामाचे कडक मॉनिटरिंग केले जात आहे. सर्व अर्ज एका निश्चित कालावधीत (Timebound manner) निकाली काढण्यावर प्रशासनाचा मुख्य भर आहे. या योजनेची प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे (SOP) कायद्यानुसार पूर्णपणे स्पष्ट असल्याने, सनद वितरणाबाबत सध्यातरी कोणतीही तक्रार आलेली नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


माझे घर' योजनेसाठी सरकारकडून दर निश्चित Goa Marathi News | goa government  fixed rates for majhe ghar scheme | Latest Goa News at Lokmat.com


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज

'माझे घर योजने'सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचाही सविस्तर आढावा घेतला. उत्तर गोव्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (Control Rooms) पूर्णपणे सक्रिय करण्यात आले आहेत. जिल्हा आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या असून, संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच, पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था टाळण्यासाठी कलम १६३ अंतर्गत आदेश जारी करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) १५ मे पासूनच नवीन रस्ते खोदण्यास कडक बंदी घातली आहे.


Bengaluru civic teams begin setting up disaster response teams as monsoon  approaches - The Hindu

हेही वाचा