कुडतरीत उघड्यावर टाकलेल्या अडीच टन सॅनीटरी पॅड्सची लावली विल्हेवाट : आमदार रेजिनाल्ड

'रेजिनाल्ड ट्रस्ट'च्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून मतदारसंघात स्वच्छता मोहीम सुरू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
कुडतरीत उघड्यावर टाकलेल्या अडीच टन सॅनीटरी पॅड्सची लावली विल्हेवाट : आमदार रेजिनाल्ड

पणजी  : गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून आम्ही आमच्या 'रेजिनाल्ड ट्रस्ट'च्या (Reginaldo Trust) माध्यमातून कुडतरी मतदारसंघातील विविध रस्ते, महामार्ग, शेत आणि नाल्यांमधील कचरा गोळा करत आहोत. पावसाळ्यापूर्वी या कचऱ्याची वेळीच उचल न झाल्यास त्याचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागेल. रस्ते आणि उघड्यावर कचरा फेकण्याची लोकांची प्रवृत्ती अद्याप बदललेली नाही. त्यामुळे आता रस्त्यावर कचरा, सॅनिटरी पॅड्स किंवा डायपर्स फेकणाऱ्यांना पकडून त्यांचे किंवा त्यांच्या वाहनांचे फोटो माझ्या कार्यालयाला किंवा पंचायतीला पाठवा; आम्ही संबंधितांवर कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करू, पण कुणीही त्यांच्याशी स्वतः वाद घालू नका, असे आवाहन कुडतरीचे आमदार आलेक्सो रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांनी केले आहे. मतदारसंघातील कचरा व्यवस्थापन आणि सिवीक सेन्स भाष्य करताना त्यांनी ही माहिती दिली.

पाहा व्हिडिओ. 




अडीच टनांपेक्षा जास्त डायपर्सची विल्हेवाट

आमदार आलेक्सो रेजिनाल्ड यांनी सांगितले कि, दर ८ ते १० दिवसांनी मुख्य रस्ते, राय (Raya) हायवे आणि आसपासच्या परिसरातील अनेक भागांतून कामगारांच्या मदतीने कचरा गोळा केला जातो. सध्या कामगार मिळणे कठीण झाले असतानाही ही मोहीम अविरत सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही महिन्यांत गोळा केलेले तब्बल २.५ टन (अडीच टन) पेक्षा जास्त वापरलेले डायपर्स, पॅम्पर्स आणि सॅनिटरी पॅड्स कुंडई (Kundai) येथील एका प्रकल्पात करारांतर्गत विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.


World Menstrual Hygiene Day 2023: Small-scale incinerators for sanitary pad  disposal in schools is n


तूर्तास लोकांकडून पैशांची आकारणी नाही

एक योग्य आणि ठोस कचरा व्यवस्थापन प्रणाली पूर्णपणे लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही जनतेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही; पण जनतेने सुज्ञपणा दाखवून कचरा मिळेल तिथे फेकणे थांबवावे," असे आमदारांनी स्पष्ट केले. हा सर्व खर्च सध्या स्वतःच्या स्तरावर ट्रस्टच्या माध्यमातून केला जात असून, मतदारसंघ स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



गाडीची काच खाली करून कचरा फेकू नका!

नागरिकांच्या सवयींवर तीव्र नाराजी व्यक्त करताना आमदार म्हणाले कि, अनेकजण दुचाकीवरून जाताना कचऱ्याच्या पिशव्या रस्त्याकडेला टाकतात, तर काहीजण आलिशान कारची काच खाली करून चालत्या गाडीतून रस्त्यावर कचरा फेकून देतात; ही चुकीची सवय आता बंद झाली पाहिजे. जर कोणाला रस्त्यावर किंवा उघड्यावर असा कचरा टाकलेला दिसला, तर त्यांनी त्वरित माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा; आम्ही २ ते ३ दिवसांत तो कचरा उचलण्याची व्यवस्था करू.


Like the garbage vehicles, the garbage carts of the municipal corporation  have also become disastrous. | कचरा वाहनों की तरह नगर निगम के कचरा उठाने  वाले ठेले भी हो गए भंगार


फोटो पाठवा; पंचायत वसूल करणार दंड

कचरा टाकणाऱ्यांशी थेट वाद न घालता नागरिकांनी काम करावे, असे आवाहन आमदारांनी केले. उघड्यावर कचरा टाकताना कोणी दिसल्यास त्याचा किंवा त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून पाठवावा. प्रशासन त्या वाहनाचा आणि व्यक्तीचा शोध घेऊन, संबंधित पंचायतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करेल आणि त्यांच्याकडूनच तो परिसर स्वच्छ करून घेतला जाईल. कुडतरी मतदारसंघ पूर्णपणे कचरामुक्त, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी जनतेने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती त्यांनी शेवटी केली.




Fine Of Rs 100 To 5000 For Throwing Waste In Public Places; Jaipur Nagar  Nigam (Greater) Updates

हेही वाचा