
पणजीः कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने आयटीआयसाठी (ITI) प्रवेश सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन (Online) अर्ज करावे लागणार. गोव्यातील (Goa) कुठल्याही आयटीआयमध्ये निवड करण्याची मुभा ऑनलाईन आहे, अशी सूचना संचालनालयाने जारी केली आहे.
इयत्ता आठवी आणि दहावीच्या विदयार्थ्यांसाठी सरकारी १० आयटीआय आणि खाजगी तीन आयटीआयमध्ये ऑनलाईन प्रवेश आजपासून खुला झाला आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना मंडळाकडून थेट एसएससी (आठवी इयत्ता) आणि एचएसएससी (दहावी इयत्ता) उत्तीर्ण प्रमाणपत्र जारी करणार. त्याशिवाय इयत्ता १२वी, पदवीधर सुद्धा अर्ज करू शकतात.
इच्छुकांनी प्रवेश मिळवण्यासाठी आयटीआय एडमीशन्स या वेबसाईटला भेट द्यावी. नंतर वेबसाईटवर त्यांनी माहिती पुस्तिका २०२६-२७ प्रथम वाचावी आणि नंतर ऑनलाईन अर्ज करावेत. आयटीआयमध्ये शिकण्यासाठी ४४ अभ्यासक्रम आहेत.
आणि इच्छुकांना कुठलाही अभ्यासक्रम ऑनलाईन निवडता येणार. संचालनालयाने कुठल्याही चौकशीसाठी सरकारी आणि खाजगी आयटीआय मध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तसेच तांत्रिक चौकशीसाठी 08326712117 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.