नीट परीक्षेच्या त्रुटींविरोधात आंदोलनासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिल्लीत

जंतर-मंतर वर आंदोलनासाठी लोकांची गर्दी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
नीट परीक्षेच्या त्रुटींविरोधात आंदोलनासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिल्लीत

नवी दिल्ली : नीट परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज शनिवारी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक जंतरजमंतर परिसरात जमा होऊ लागले आहेत.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतील बोस्टनहून भारतात परतल्यानंतर त्यांनी “शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे नेऊया” असे आवाहन केले. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी जंतर-मंतर येथे सर्वांना भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली.

सोनम वांगचुक यांचेही आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत 

दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी झटणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

दिल्ली पोलिसांची सुरक्षेवर लक्ष 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विमानतळ, सीमावर्ती प्रवेशबिंदू तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा