कला महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
कला महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

पणजीः गोवा कला महाविद्यालयात (Goa College of Art)  बी.एफ.ए. पेण्टींग आणि अप्लायड आर्ट या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश जाहीर केला आहे. सर्व आवश्यक स्वत: प्रमाणीत केलेल्या कागदपत्रांसहीत महाविद्यालयाच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२६ पर्यंत आहे. 

महाविद्यालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, बी.एफ.ए. पेण्टींग तसेच अप्लायड आर्ट (Applied Art) पदवी अभ्यासक्रमासाठी माहिती पुस्तिका, प्रवेश अर्ज आणि प्रवेशाचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

प्रवेशासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता अशी आहे. उमेदवाराने गोवा माध्यमीक आणि उच्च माध्यमीक शिक्षण बोर्डामार्फत (Goa Board of Secondary and Higher Secondary Education)  आयोजीत इंग्रजी विषयात दहावी व बारावीची परीक्षा किंवा त्याला समान असलेली परीक्षा कुठल्याही विद्यापीठातून किंवा संस्थेतून किमान ४५ टक्के गुणासहीत उत्तीर्ण व्हायला हवी. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ४० टक्के गुण अशी सवलत आहे.  

प्रवेशाच्या वेळी महाविद्यालयात घेतलेल्या चाचणीत सर्व विषयांमध्ये उमेदवाराने उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अधिक माहिती आणि इतर पात्रता अटींसाठी, उमेदवार महाविद्यालयाच्या वेबसाईटवर असलेली माहिती पुस्तिका पाहू शकतात. 

हेही वाचा