गिरी, म्हापसा येथे इनोव्हा कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गिरी, म्हापसा येथे  इनोव्हा कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

म्हापसा :  गिरी, म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर ग्रीन पार्कजवळील जंक्शनवर इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार श्रेयांश तेली (२४ वर्षे, पेडणे) यांचे इस्पीतळात उपचार सुरू असताना निधन झाले. 

अपघातानंतर (Accident) गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार श्रेयांश तेली यांना तातडीने इस्पीतळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना निधन झाले. अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. अपघात नेमका कसा घडला याची माहिती गोवा पोलीस (Goa Police) घेत आहेत. 

वाहने चालवताना खबरदारी घ्यावी : वाहतूक पोलीस

दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून वाहने चालवावीत असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) केले आहे. कुठल्याही नशेत वाहने चालवू नयेत असे वाहतूक पोलिसांनी सूचित केले आहे. 


बातमी अपडेट होत आहे.