मणिपुरमध्ये काही गावांवर कुकी अतिरेक्यांचा हल्ला; घरे जाळली

नागरिकांचे अपहरण; गावकरी पळाले जंगलात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
मणिपुरमध्ये काही गावांवर कुकी अतिरेक्यांचा हल्ला; घरे जाळली

इम्फाळ : जातीय संघर्षाने आधीच अस्थिर झालेल्या मणिपुरमध्ये (Manipur)  गुरुवारी पहाटे मोठी हिंसक घटना घडली. म्यानमारस्थित कुकी अतिरेक्यांनी (Myanmar-based Kuki extremists) कमजोंग जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेलगतच्या नागा (Naga villages) तसेच नजीकच्या गावांवर हल्ला करत दहशत माजवली. त्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक गावकरी आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाले.

तांगखुल नागा समाजाच्या सर्वोच्च संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी गावांमध्ये अंधाधुंद गोळीबार करत अनेक घरे पेटवून दिली. तसेच किमान दोन नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून; नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.  हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मणिपूरमधील जातीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा