रायबंदर फेरी धक्क्याजवळ आढळला अज्ञाताचा मृतदेह

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
रायबंदर फेरी धक्क्याजवळ आढळला अज्ञाताचा मृतदेह

पणजी : रायबंदर येथील फेरी धक्क्याजवळ शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या काही स्थानिक नागरिकांना हा मृतदेह निदर्शनास आला, ज्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी केली जात आहे. तसेच, घातपाताची शक्यता तपासण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा