येत्या निवडणुकीत भाजपला ३० जागा निश्चित : मुख्यमंत्री

गोव्यातही भाजपकडून साजरा झाला विजयोत्सव, पणजीत काढली शोभा यात्रा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 mins ago
येत्या निवडणुकीत भाजपला ३० जागा निश्चित : मुख्यमंत्री

पणजी : भारतीय जनता पक्षाचे संस्थापक स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालचे बांगलादेशात विलीन होण्यापासून रक्षण केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोरांपासून पश्चिम बंगालचे संरक्षण केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची घोडदौड कायम सुरूच राहणार  आहे.  येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात (Goa) ३० जागा मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. 


पश्चिम बंगालसह (West Bengal) आसाम (Assam), पुद्दुचेरी येथे भाजपला (BJP)  मोठ्या प्रमाणात यश मिळाले. केरळ तसेच तामिळनाडूतही (Tamil Nadu)  भाजपने खाते उघडले आहे. यानिमित्त पक्षातर्फे पणजीत विजयोत्सव साजरा झाला. जाहीर सभेनंतर पणजीत विजय यात्रा काढण्यात आली.

प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, मंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई,  आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष नितीन नबीन व असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पाच राज्यांतील निवडणुकांत मिळालेले यश हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलीत आहे. येत्या निवडणुकीत गोव्यातही पक्षाला ३० जागांवर निश्चितपणे विजय मिळेल, असे दामू नाईक म्हणाले. ढोल, ताशांच्या गजरात व घोषणा देत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

हेही वाचा