धार्म‌िक भावना दुखावल्याप्रकरणी सेबीला अटक करा; नागर‌िकांचा वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
धार्म‌िक भावना दुखावल्याप्रकरणी सेबीला अटक करा; नागर‌िकांचा वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा

वास्को : गोव्यात (Goa) धार्म‌िक भावना (Religious feelings)  दुखावणारे व्हिडीओ, वक्तव्ये वादग्रस्त ठरू लागली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण होऊ लागला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून सेबी वास याने धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करीत; त्याच्या निषेधार्थ सोमवारी मुरगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी वास्को पोलीस ठाण्यावर (Vasco Police Station) मोर्चा नेला. आणि सेबी वास याच्याविरुद्ध रितसर तक्रार नोंदवण्यात आली. 

सेबी वास याने सोशल मिडियावर (Social media)  टाकलेल्या व्हिडीओतून धार्म‌िक भावना दुखावल्या असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जमलेल्या नागरिकांनी लावून धरली. पोलिसांनी त्याला लवकर अटक करून रितसर कारवाई करावी. अन्यथा स्वस्त बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. सेबी वास फरारी असल्यास त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करावी व त्याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

हेही वाचा