पानिहाटीमध्ये ‘आरजी कर’ पीडितेची आई आघाडीवर; पश्चिम बंगालमध्ये भाजपची झेप!

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
पानिहाटीमध्ये ‘आरजी कर’ पीडितेची आई आघाडीवर; पश्चिम बंगालमध्ये भाजपची झेप!

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal assembly election result) पानिहाटी विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची लढत रंगली आहे.  आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (Kolkata's RG Kar Medical College and Hospital)  बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडित तरुणीची आई रत्ना देबनाथ या सध्या आघाडीवर आहेत. त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

सकाळी सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तिर्थंनकर घोष आघाडीवर होते; मात्र मतमोजणी पुढे सरकताच चित्र बदलले आणि आता ते मागे पडले आहेत. राज्यात एकूणच भाजपने जोरदार कामगिरी करत १८३ जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस ११० जागांवर पुढे आहे. बंगालमध्ये कधीही सत्ता स्थापन करू न शकलेल्या भाजपसाठी ही ऐतिहासिक झेप मानली जात आहे.

महिलांवरील गुन्ह्यांचा मुद्दा मांडला ठळकपणे 

रत्ना देबनाथ यांनी आपल्या प्रचारात राज्यातील महिलांवरील गुन्ह्यांचा मुद्दा ठळकपणे मांडत ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. आरजी कर रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली होती आणि या घटनेने प्रशासन व संस्थात्मक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान 

या प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनांना सुरूवातीला मोठा प्रतिसाद मिळाला.  मात्र कालांतराने त्याची तीव्रता कमी झाली. काही आंदोलकांनी दबाव, बदलीसारख्या कारवायांचे आरोप केले असून, या प्रकरणांपैकी काही मुद्दे कोलकाता उच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहेत. पानिहाटीचा निकाल केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या व्यापक राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो.

हेही वाचा