टीएमसीच्या दडपशाहीचा अंत : दामू नाईक

पणजी : पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये जी दडपशाही चालत होती; त्याचा अंत झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे पश्चिम बंगालात (West Bengal) भाजपला यश मिळाले. आता विकासाची गंगा पश्चिम बंगालात वहायला लागणार. भाजपचे (BJP) संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत त्यांच्या विचारांचे सरकार आले, याची खूषी आहे; असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
देशात सुरू असलेल्या विकासाचा परिणाम : खासदार शेट तानावडे
स्वामी विवेकानंद, गुरूदेव रवींद्रदनाथ टागोर, सुभाषचंद्र भोस यांच्या सारख्या युगपुरूषांच्या जन्मभूमीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणे ही खूषीची गोष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे नेतृत्त्व, कार्यकत्यांचे परिश्रम आणि देशात सुरू असलेल्या विकासाचा हा परिणाम आहे, असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीत भाजपला यश : दिगंबर कामत
केरळ सोडून पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या सर्व राज्यांनी भाजपला यश मिळाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष नितीन नबीन यांनी बंगाल पिंजून काढला. त्यामुळे प्रथमच पश्चिम बंगालात भाजपला यश मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे (PWD) मंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.