आयसिसच्या विचारसरणीचा प्रभाव? 'कलमा' येत नाही म्हणून सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला

'अमेरिका रिटर्न' उच्चशिक्षित शिक्षकाच्या कृत्याने मुंबई हादरली; संशयित जैब अन्सारीला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
57 mins ago
आयसिसच्या विचारसरणीचा प्रभाव? 'कलमा' येत नाही म्हणून सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील मीरा रोड परिसरात रविवारी पहाटे एका भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. धर्म विचारल्यानंतर 'कलमा' वाचता येत नाही, असे उत्तर मिळाल्याने एका ३१ वर्षीय तरुणाने दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जैब जुबैर अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ऑनलाइन डेटावरून तो 'आयसिस' (ISIS) सारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रचार व्हिडिओंनी प्रभावित असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.


'Mumbai Mira Road murder accused was HIV+, taught math to victim': Report |  Today News


ही घटना मीरा रोड पूर्व भागातील एका निर्माणाधीन इमारतीजवळ पहाटे ४ च्या सुमारास घडली. राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यावर असताना संशयित अन्सारी तिथे पोहोचला. त्याने सुरुवातीला त्यांना नाव आणि धर्म विचारला. रक्षकांनी आपली ओळख सांगितल्यावर, अन्सारीने त्यांना 'कलमा' वाचता येतो का, अशी विचारणा केली. जेव्हा दोन्ही रक्षकांनी 'नाही' असे उत्तर दिले, तेव्हा अन्सारीने अचानक चाकू काढून त्यांच्यावर हल्ला चढवला.



या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या आतड्यांना मोठी इजा झाली आहे, तर सुब्रतो सेन यांच्या पाठीवर जखम झाली आहे. हल्ल्यानंतर सेन यांनी प्रसंगावधान राखून सुरक्षा केबिनमध्ये स्वतःला लपवून घेतले. आरोपी पळून गेल्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि जखमींना वोखार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.


Mira Road horror: Man stabs 2 security guards after he asked them if they  could recite Kalma - India Today


पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दीड तासाच्या आत संशयिताचा माग काढला. अन्सारीला नया नगर भागातील त्याच्या भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान अन्सारीच्या पार्श्वभूमीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. तो उच्चशिक्षित असून २०१९ पर्यंत अमेरिकेत शिकत होता. भारतात परतल्यानंतर तो एका कोचिंग सेंटरमध्ये रसायनशास्त्र आणि गणित विषय शिकवत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एकटाच राहत होता आणि त्याच्या घरमालकाने त्याला घर रिकामे करण्यास सांगितले होते.


Mira Road Stabbing: US-Returned Man Asks 2 Security Guards To Recite Kalma,  Then Attacks Them; ATS Probes 'Lone Wolf' Terror Angle As ISIS-Linked  Material Recovered


सर्वात गंभीर बाब म्हणजे, अन्सारीच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासणीत तो वारंवार आयसिसशी संबंधित कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असल्याचे आढळले आहे. हा केवळ रागाच्या भरात केलेला हल्ला आहे की त्यामागे एखादी मोठी वैचारिक किंवा दहशतवादी लिंक आहे, याचा सखोल तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मीरा रोड परिसरात तणावाचे वातावरण असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


हेही वाचा