
पैंगीण : काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) पैंगीण पंचायत क्षेत्रातील आमोणे येथे आग लागून घर पूर्णपणे भस्मसात झाले. आगीत घरातील सर्व साहित्याचे नुकसान झाले. यासंदर्भात काणकोण अग्नीशमन दलाला (Canacona Fire Station) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
घरातील मंडळी वाड्यावरील एका लग्न कार्याला गेले होते तर काही लोक स्नेहसंमेलनाला गेले होते. त्यावेळीच घराला लाग लागल्याने; कुणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे आग सर्वत्र पसरली. त्यात घर भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्नीशमन दलाला माहिती दिली. आणि स्थानिकांच्या सहकार्याने आग विझवण्यास सहकार्य केले. त्यानंतर अग्नीशामक दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली. घरातील रेफ्रिजरेटरच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.