लोकसभा अध्यक्ष, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्याही शुभेच्छा!

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासहीत अनेक केंद्रीयमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सामाजीक माध्यमांवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! विविध क्षेत्रांत गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते अग्रस्थानी राहून कार्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी सदिच्छा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विटर खात्यावरील आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि सातत्यपूर्ण लोकसेवेसाठी प्रार्थना.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath) यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी, कीर्तिमान जीवन लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली गोवा राज्य प्रगतीच्या मार्गावर सतत वाटचाल करत राहो, हीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्यासहीत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.