भोमा अपघातातील जखमी वकिलाचे गोमेकॉत निधन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
26 mins ago
भोमा अपघातातील जखमी वकिलाचे गोमेकॉत निधन

फोंडा : भोमा पंचायती (Bhoma Panchayat) जवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री टेम्पोला मागाहून स्कूटरची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या ॲड. संज्योत कामत (४६ वर्षे, कुंडई) यांचे गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. 

 पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार जीए -०५ - टी -०२२८ क्रमांकाचा टेम्पो पणजीहून फोंडा येथे जात होता. त्यावेळी मागाहून येणाऱ्या जीए- ०५-एन-६३५३ क्रमांकाच्या स्कूटरची धडक टेम्पोला बसली. टेम्पोला धडक बसल्याचे समजताच चालकाने टेम्पो रस्त्यावर थांबवली. त्यावेळी टेम्पो मागे स्कूटर चालक रस्त्यावर कोसळून जखमी झालेला त्याला दिसला.

जखमीला त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून मडकई प्राथमिक आरोग्य (Marcaim Primary Health Centre)  केंद्रात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे उपचार सुरू असताना ॲड. संज्योत कामत यांचे निधन झाले.

म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव गावडे यांनी अपघाताचा पंचनामा केला. गुरुवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

हेही वाचा