
वास्को : बौद्धिकदृष्ट्या आव्हानग्रस्त असलेली उत्तर गोव्यातील (North Goa) एक मुलगी कुठ्ठाळीला पोहोचली. याठिकाणी ही मुलगी गोंधळ घालत असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना मिळताच त्यांनी तिच्या कुटुंबीयांची माहिती काढून त्यांच्याकडे सुपूर्द केले.
ही मुलगी चुकून कुठ्ठाळीला पोहोचली होती. याठिकाणी ती मुलगी गोंधळ घालत असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना (Verna Police) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने धाव घेत मुलीची चौकशी करून पोलीस स्थानकात आणले.मात्र, तिला आपल्या कुटुंबीयांची माहिती देता येत नव्हती.
त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. सातत्याने चौकशी करून व विविध स्त्रोतांच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांची माहिती काढली व त्यांना कळीत केले. हरवलेली मुलगी वेर्णा पोलीस स्थानकात असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय (Family) याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. वेर्णा पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.