गोव्यात सिलिंडरची मागणी आणि पुरवठा सुरळीत : संजीव गडकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
गोव्यात सिलिंडरची मागणी आणि पुरवठा सुरळीत : संजीव गडकर

पणजीः "सरकारी आदेशानुसार व्यावसायिक सिलिंडरचा (Commercial LPG)  पुरवठा ६० टक्के स्तरावर राखला जात आह. त्यामुळे व्यावसायिक गॅस बाजार स्थिर ठेवण्यास मदत होत आहे," असे नागरी पुरवठा खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी सांगितले. 

घरगुती गॅस बुकिंगमधील चढ-उतारांवर भाष्य करताना ते म्हणाले की, युद्धाच्या परिस्थितीपूर्वी दररोज सरासरी ११,४१२ सिलिंडरचे बुकिंग होत होते, जे मार्च २०२६ मध्ये वाढून १३,०३७ झाले होते. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये हे प्रमाण ८,९५२ पर्यंत खाली आले आहे, जे मागणीचे सुलभीकरण दर्शवते."

स्थानिक पत्त्याचा पुरावा नसलेले स्थलांतरीत मजूर आणि विद्यार्थी यांच्या मदतीसाठी तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल २०२६ दरम्यान सुमारे ११ हजार  'फ्री ट्रेड' ५ किलोचे एलपीजी सिलिंडर वितरित केले.  

ज्यांच्याकडे स्थानिक रहिवासी कागदपत्रे नाहीत अशांना एलपीजी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना स्वयंपाकाचा आवश्यक गॅस उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे; असे संजीव गडकर यांनी सांगितले.

संजीव गडकर यांनी डिजिटल प्रणालीतील महत्त्वपूर्ण सुधारणांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "डिजिटल बुकिंगची (Digital Booking)  टक्केवारी ९०% च्या वर पोहोचली आहे, जी मार्च २०२६ पूर्वी ७०-७५% होती. "डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडचा (DAC)/OTP) वापर आता ९०% हून अधिक झाला आहे, जो पूर्वी केवळ ३२-३३% होता. यामुळे आमच्या वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे."

"डिजिटल बुकिंग आणि वितरण पारदर्शकतेतील या सुधारणा गोव्यातील आमच्या ग्राहकांना विश्वसनीय आणि कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच, याद्वारे आम्ही ऑपरेशन्समधील पारदर्शकतेचा सर्वोच्च दर्जा राखत आहोत." असे संजीव गडकर शेवटी म्हणाले.


हेही वाचा