व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसाय धोक्यात!

व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची संघटनेची मागणी


14th April, 06:02 pm
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसाय धोक्यात!

पत्रकार परिषदेत बोलताना गोवा कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश भिंगी. सोबत संघटनेचे पदाधिकारी.
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : गोव्यात गॅस व्यावसायिकाना गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कॅटरिंग व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यावसायिक होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच घेतलेल्या आगाऊ ऑर्डर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुदेश भिंगी यांनी केली. गोवा कॅटरिंग असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष भिंगी बोलत होते.
फोंडा येथे पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना भिंगी म्हणाले की, पश्चिम आशियात इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणे कठीण झाले आहे. घरगुती गॅस घरपोच देण्यात गोवा सरकार यशस्वी ठरत आहे; परंतु कॅटरिंग क्षेत्रात गॅस सिलिंडरचा तुटवडा झाला असल्यामुळे लग्न व अन्य समारंभांत लोकांना आवश्यक पदार्थ देण्यात अडथळा निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी आगाऊ ऑर्डर घेतल्या असून गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून कॅटरिंग व्यावसायिकांना सुरळीत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा