पणजी कदंबा पठारावर क्रेटा कारची इनोव्हाला धडक; पाच जण जखमी

चार जण गंभीर; क्रेटा चालक पळाला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
पणजी कदंबा पठारावर क्रेटा कारची इनोव्हाला धडक; पाच जण जखमी

पणजी : पणजीतील (Panjim)  कदंबा पठारावर (Kadmba Plateau)  क्रेटा कारची (Creta car)  समोरून येणाऱ्या इनोव्हाला (Innova car) धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने; त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ)  दाखल करण्यात आले.   

अपघातानंतर क्रेटा चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पलायन केले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.  अपघात नेमका कसा घडला याचा पोलीस तपास करीत आहेत. 

हेही वाचा