संशयित आरोपी सुरज नाईकला अटक

म्हापसा : बार्देश तालुक्यातील एका साडेपाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सुरज नाईक (२८, रा. बार्देश) याला अटक केली.
ही घटना सोमवारी १३ एप्रिल रोजी उघडकीस आली. संशयित हा गेले चार दिवस पीडितेवर अत्याचार करत होता. पीडितेचे आई वडील हे कामानिमित्त घराबाहेर असायचे, तर मोठा ८ वर्षीय भाऊ हा खेळण्यासाठी जात असत. तेव्हा पीडित बालिका घरात एकटीच असल्याची संधी साधून संशयित आरोपी तिच्या घरी जाऊन हे दुष्कृत करत असे.
पीडितेने सोमवारी आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग आई आणि आजीला सांगितला. त्यानंतर त्यांनी कोलवाळ पोलिसांत धाव घेतली व रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला पकडून अटक केली.
पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६५(२), तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ व १२ आणि गोवा बाल कायदा कलम ८(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांमया मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.