संशयित सोहम नाईकला क्राईम ब्रांचने केली तिसऱ्या गुन्ह्यात केली अटक

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
संशयित सोहम नाईकला क्राईम ब्रांचने केली तिसऱ्या गुन्ह्यात केली अटक

पणजी : कुडचडे येथील लैंगिक अत्याचार (Curchorem Sexual assault)  प्रकरणात संशयित सोहम नाईक याला क्राईम ब्रांचने (Crime Branch) तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे.  कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आता पर्यंत ५ गुन्हे दाखल झाले आहेत.

काही अल्पवयीन मुलींनीही त्याच्या विरुद्ध लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी केल्या आहेत.  क्राईब ब्रांचने याप्रकरणी तपास करताना पीड‌ितांच्या जबान्या नोंदवून घेतल्या आहेत. मुलींशी मैत्री करून व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा तसेच व्हिडीओ चित्रीकरण करून इतरांना पाठवल्याचा आरोप त्याच्याविरुद्ध आहे. 

याप्रकरणी आलेल्या तक्रारी तसेच वाढत्या दबावामुळे कुडचडे पोलिसांनी (Curchorem Police)  संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध २२ मार्च रोजी रात्री गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे देण्यात आले होते. 

हेही वाचा