कर्नाटक–गोवा महामार्गावर अनमोड येथे ट्रकचा अपघात

दोन सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
कर्नाटक–गोवा महामार्गावर अनमोड येथे ट्रकचा अपघात

अनमोड (ता. जोयडा) : कर्नाटकातून (Karnataka)  गोव्याच्या (Goa) दिशेने जाणाऱ्या ट्रकने (Truck)  आज सकाळी अनमोड येथील वन विभागाच्या तपासणी नाक्याला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन सुरक्षारक्षक नशिबाने बचावले असून; तपासणी नाक्याचे मोठे नुकसान झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोड (Anmod) वन विभागाच्या (Forest Department) तपासणी नाक्यावर तपासणी व वन्यजीव प्रवेश शुल्क वसुलीसाठी दोन सुरक्षा रक्षक उभे होते. त्यावेळी गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक तपासणी नाका ओलांडून पुढे गेला. मात्र; अचानक ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो मागे (रिव्हर्स) सरकू लागला आणि थेट तपासणी नाक्याला जाऊन धडकला.

या घटनेत दोन सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले असून; कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे तपासणी नाक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे.

हेही वाचा