
पणजी : पाटो, पणजी (Panjim) येथे गुरुवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ला (Attempt to murder) प्रकरणात पणजी पोलिसांनी (Goa Police) संशयित समीर खान याला अटक केली. या हल्ल्यात शंकर राम बहादूर गंभीर जखमी झाले असून; त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पाटो परिसरात काही कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस करीत आहे. हल्ला करण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.