
म्हापसा : गोव्यातील (Goa) म्हापसा (Mapusa) येथील बाजारपेठेत (Market) गेल्या काही दिवसांमागे दुकाने फोडल्याप्रकरणी महाराष्ट्रातील (Maharashtra) कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) दोघा संशयित चोरांना अटक केली आहे. या दोघांनी सावंतवाडी (Sawantwadi) आणि कणकवली बाजारपेठेतही याच पद्धतीने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघाही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणी दुकानफोडी केल्याची कबुली दिली आहे.
पुढील तपास कणकवली पोलीस करत असून, आणखी काही गुन्ह्यांशी या आरोपींचा संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. म्हापसा बाजारपेठेतील दुकान फोडीप्रकरणी म्हापसा पोलीस या दोघांना ताब्यात घेणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे म्हापसा बाजारपेठेतील सहा दुकाने फोडून रोख रक्कम पळविण्यात आली होती.