
मडगाव: निष्काळजीपणेवाहन चालवून एकाच्या मृत्यूसकारणीभूत ठरल्याप्रकरणीतिळामळ, केपे(Tilamol-Quepem) येथील रहिवासीमंदेश्वर मनोज पैंगीणकर (३२वर्षे) याचा जामीनअर्ज मडगाव सत्र न्यायालयाने(Session court Margao) फेटाळूनलावला आहे. मद्यधुंदअवस्थेत निष्काळजीपणे गाडीचालवून दुचाकीचालकाच्यामृत्यूला कारणीभूत ठरल्याचाआरोप संशयितावर आहे.
असोल्डा येथील कोप्रामोडीबस थांब्याजवळ ३० मार्च रोजीरात्री १०.१०वाजण्याच्या सुमारास हा अपघातझाला होता. संशयितमंदेश्वर हा आपली झेन कारबेदरकारपणे चालवत आला व त्यानेसमोरून येणार्या ज्युपिटरस्कूटरला धडक दिली.
याअपघातात स्कूटर चालक उत्पलनाईक याचा मृत्यू झाला तरअश्लेष भंडारी हा युवक गंभीरजखमी झाला. संशयितमंदेश्वर याच्यावर यापूर्वीहीबेदरकारपणे गाडी चालवल्याचागुन्हा दाखल असून; त्याचाखटला अद्याप प्रलंबित आहे.
अपघात घडला तेव्हासंशयित मद्यधुंद अवस्थेतअतिवेगाने गाडी चालवत होता.अपघातानंतर संशयितानेघटनास्थळावरून पळ काढला होता.त्यानंतर पोलिसांनीत्याला शेल्डे येथे रस्त्याबाजूनेचालत जाताना पकडले होते. या बाबी न्यायालयासमोरमांडण्यात आल्या. न्यायाधीशशेरीन जी. पॉल यांनीजामीन अर्ज फेटाळला. यागंभीर गुन्ह्याची व्याप्तीआणि संशयिताची पार्श्वभूमीलक्षात घेता त्याला जामीननाकारण्यात येत असल्याचेनिरीक्षण न्यायालयाने नोंदवले.