सारझोरा येथे स्वयंअपघातात युवकाचा मृत्यू

ईस्टर साजरा करुन परतताना अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
सारझोरा येथे स्वयंअपघातात युवकाचा मृत्यू

मडगाव : ईस्टर सण साजरा करून कुंकळ्ळी येथील घरी परतत असताना रविवारी झालेल्या दुचाकीच्या स्वयंअपघातात असोल्डा- केपे येथील २७ वर्षीय विल्सन सोरेंग याला गंभीर दुखापत झाली. इस्पितळात नेतानाच त्याचा मृत्यू झाला.

विल्सन सोरेंग हा आपल्या मित्रांसोबत शनिवारी रात्री इस्टरच्या प्रार्थनेसाठी कुंकळ्ळी येथे गेला होता. प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यानंतर मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी तिथेच थांबला होता. रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असताना, सारझोरा येथे त्याच्या दुचाकीला स्वयंअपघात झाला.

अपघातानंतर जखमी अवस्थेत विल्सनला तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. कुंकळ्ळी पोलिसांनी या अपघातप्रकरणी नोंद केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक आदित्य सावंत या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा