आंध्रप्रदेशमध्ये पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

माचेर्ला येथील प्रकार : महिलेने एचआयव्हीबाधित असल्याचे सांगताच गुप्तांगात घुसवली सळई

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
39 mins ago
आंध्रप्रदेशमध्ये पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

विजयवाडा : आंध्रप्रदेशमधील पालनाडू (Palnadu) जिल्ह्यातील माचेर्ला (Macherla) शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या एका अज्ञाताने चाकूचा धाक दाखवून ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार (rape) केला. तिने आपल्याला एचआयव्हीची बाधा (HIV infection) झाली असल्याचे सांगताच संतापलेल्या बलात्काऱ्याने त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवल्याने ती गंभीर जखमी झाली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी पीडितेच्या राहत्या घरी घडली. ही महिला माचेर्ला शहरात सरकारी कर्मचारी म्हणून काम करते. हा प्रकार घडला, तेव्हा ती घरी एकटीच होती.

पिण्यासाठी पाणी मागत घरात प्रवेश...

माचेर्ला शहराचे सर्कल पोलीस इन्स्पेक्टर व्यंकट रमणा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपी पिण्यासाठी पाणी मागत पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने महिलेवर जबरदस्ती केली. पीडितेवर सध्या नरसारावपेटा एरिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

स्कार्फने बांधले, चाकूचा धाक दाखवून बलात्कार...

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या घरात प्रवेश केल्यानंतर आरोपीने तिला स्कार्फने बांधले, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला, तिला मारहाण केली आणि पीडितेने आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याचा दावा केल्यानंतर तिच्या शरीरात लोखंडी सळई घातली. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

मावशी फोन उचलत नसल्यामुळे भाच्याला आला संशय

पीडिसोबत तिचा भाचा राहत होता. दहावीची परीक्षा संपल्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला असता, हा प्रकार घडला. त्या मुलाने पीडितेला तिच्या मोबाईल फोनवर अनेक वेळा फोन केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. काही तरी गडबड असल्याची शंका आल्यामुणे त्याने आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना तिच्या घरी जाऊन तिची विचारपूस करण्यास सांगितले.

त्यानंतर स्थानिक लोक महिलेच्या घरी गेले असता, ती बेशुद्धास्थेत पडलेली आढळली. त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. त्यानंतर तिला उपचारांसाठी माचेर्ला सरकारी रुग्णालयात आणि नंतर नरसारावपेटा एरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चार पोलीस पथके आरोपीच्या मागावर 

पालनाडू जिल्हा पोलिसांनी (Palnadu Police) चार विशेष पथके तयार केली असून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.       

हेही वाचा