११ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना मसुदा तयार

७ एप्रिल पर्यंत हरकती सादर करण्याची संधी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
58 mins ago
११ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना मसुदा तयार

पणजी : गोवा राज्य निवडणूक आयोगाने (Goa State Election Commission)  गोव्यातील ११ नगरपालिकांच्या (Muncipality)  निवडणुकीसाठी (Election) प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रभाग फेररचनेचा मसुदा हरकतींसाठी सार्वजनिक केला आहे. एप्र‌िल ७ तारीख पर्यंत मसुदा हरकती मांडण्यासाठी खुला असणार आहे, अशी सूचना आयोगाने जारी केली आहे. 

गोवा नगरपालिका कायदा (Goa Muncipality Act), १९६८च्या कलम ९ आणि १० अन्वये आयोगामार्फत प्रभागांची संख्या आणि त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  या प्रक्रियेत सध्या पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा आणि सांगे नगरपालिकांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने संबंधीत तालुक्यांच्या उपज‌िल्हाधिकाऱ्यांची  मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच संबंधीत मामलेदारांवर ‘सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून जबाबदारी सोपवली आहे. प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा सर्वसामान्य लोकांसाठी ३१ मार्च २०२६ ते ७ एप्रिल २०२६ या काळात कार्यालयीन वेळेत पहाण्यासाठी खुला असणार आहे. ३ एप्रिल (सार्वजनिक सुट्टी) आणि ५ एप्रिलला (रविवार) हे दोन दिवस सोडून इतर दिवसांत नागरिक हा मसुदा मामलेदार कचेरी किंवा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालयात पाहून आपल्या हरकती मांडू शकतात.  

हेही वाचा