
पणजी : कुडचडे (Curchorem) येथील लैंगिक अत्याचार (Sex scandal) प्रकरणात तक्रारी देण्यास पुढे येत असलेल्यांची संख्या वाढत आहे. याप्रकरणी संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आणखी एक तक्रार नोंद झाली आहे. १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत त्याच्यावर एकूण ४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
कुडचडे येथे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी सध्या क्राईम ब्रॅंच (Crime Branch) अधिक तपास करीत आहे. क्राईम ब्रॅंचने काल तपासाच्या अनुषंगाने सोहन याच्या घराची झडती घेतली होती. याप्रकरणी २० युवतींवर लैंगिक अत्याचार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
सोहम याने आपण काही मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ (Video) बनवल्याची माहिती आपल्या मित्रांना दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. स्थानिक ग्रामस्थ व काही नगरसेवकांनी कुडचडे पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणाची संवेदनशीलता पाहिल्यानंतर प्रकरण तपासासाठी क्राईम ब्रॅंचकडे देण्यात आले आहे. सध्या तपासाला गती मिळाली आहे.
बातमी अपडेट होत आहे.