मुरगाव बंदरात इंधन घेऊन महिन्यातील तिसरे जहाज दाखल

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
24 mins ago
मुरगाव बंदरात इंधन घेऊन महिन्यातील तिसरे जहाज दाखल

वास्को : मुरगाव बंदरात (Mormugao Port) महिन्यातील तिसरे टॅंकर जहाज (Tanker ship) आज गुरुवारी ) इंधन घेऊन दाखल झाले. ‘एम. व्ही. सन्मार सितार (M.V. Sanmar Sitar)  या टॅंकर जहाजाद्वारे गोव्यामध्ये (Goa ) १८ हजार मेट्र‌िक टन डिझेल तर ८ हजार मेट्र‌िक टन पेट्रोल आणण्यात आले. 

डेपोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याला दरमहा इंधनाचे तीन टॅंकर मिळतात. तसेच गोव्याकडे किमान १५ दिवसांचा इंधनाचा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि समाजमाध्यमांवर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा