कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरण; पीडितांना न्याय मिळेल : मं‌त्री फळदेसाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरण; पीडितांना न्याय मिळेल : मं‌त्री फळदेसाई

पणजी : कुडचडेतील (Curchorem) लैंगिक अत्याचारप्रकरण सरकारने (Government)  व गृहखात्याने (Home Department)  गांभीर्याने घेतले आहे. प्रकरणाचा तपास  क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे. पीडितांना न्याय मिळेल असे समाज कल्याणमंत्री (Social Welfare Minister)  तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसून; राजकीय हस्तक्षेप असल्यास याप्रकरणाचा एवढ्या गतीने तपास झाला नसता; असेही मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले. 

कुडचडे येथे अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची तक्रार नोंद झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सोहम नाईक याला अटक केली आहे. याप्रकरणी कोठडीत घेऊन त्याचा तपास सुरू आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांना विचारले असता; त्यांनी वरील माहिती दिली. 

प्रकरण पुढे येताच पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास योग्यरित्या होऊ शकणार नाही. पोलिसांवर दबाव येणार अशा प्रकारचा मतप्रवाह तयार होताच गृहखात्याने हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे दिले आहे. आयपीएस अधिकारी याप्रकरणी तपास करीत आहे.  याप्रकरणाचा सखोल तपास होणार व पीडितांना न्याय मिळेल असे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले. 

दरम्यान, संशयिताने याप्रकरणी २० तरुणींना जाळ्यात ओढल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यात काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.  आतापर्यंत ४ युवती तक्रार देण्यास पुढे आल्या आहेत. पीडितांच्या व संबंधितांच्या जबान्या नोंदवण्यात येत आहेत.

मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी बिगर सरकारी संस्था (एनजीओ) व महिला संघटनांचीही मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पॉक्सो व गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा