कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरण; क्राईम ब्रॅंचकडून सोहम नाईकच्या घराची झडती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरण; क्राईम ब्रॅंचकडून सोहम नाईकच्या घराची झडती

पणजी : कुडचडे (Curchorem) लैंगिक अत्याचारप्रकरणी (Sex scandal)  क्राईम ब्रॅंचने (Crime Branch) आज संशयित सोहम नाईक याच्या घराची झडती घेणे सुरू केले. क्राईम ब्रॅंचचे पथक वाहने घेऊन संशयिताच्या घरी पोहोचले व नंतर घराची झडती घेणे सुरू होते. 

क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक परेश नाईक यांच्यासहीत इतरांचा या पथकात समावेश होता. कुडचडेतील लैंगिक अत्याचारप्रकरणात यापूर्वीच सोहम नाईक याला अटक करून कोठडीत घेतले आहे. आणि सखोल तपास सुरू आहे.

याप्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे व मुद्देमाल शोधण्यासाठी पथकाने घराची झडती घेतली. संशयिताने मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्ह‌िडीओ काढल्याचे तक्रारीत पुढे आले आहे.  या अनुषंगाने तपास करण्यासाठी क्राईम ब्रॅंचच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेणे सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, संशयिताने सुमारे २० तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. या एकूण प्रकरणाचा सखोल तपास सध्या क्राईम ब्रॅंच करीत आहे. 


हेही वाचा