मये येथे माल्याच्या जत्रेत तणाव; पोलिसांनी आणली परिस्थिती नियंणात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
मये येथे माल्याच्या जत्रेत तणाव; पोलिसांनी आणली परिस्थिती नियंणात

पणजी : मये (Mayem) येथे माल्याच्या जत्रेत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी (Goa Police) मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नेमक्या कुठल्या कारणाने भांडण झाले व मये माल्याच्या जत्रेत तणावाची स्थिती निर्माण झाली  त्याचा तपास पोलीस करीत आहेत. एकूण या घटनेच्या पार्श्वभूमीवर या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

 जत्रा उत्सवाला गालबोट

दरम्यान, मये येथे माल्याच्या जत्रेत मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले होते. एकूण भावभक्तीचे व उत्साहाचे वातावरण मंदिरात होते. मात्र, या तणावामुळे जत्रा उत्सवाला गालबोट लागले. त्याचा परिणाम मोठ्या उत्साहाने आपल्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांवर झाला.

पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस कायदा व सुव्यवस्था (Law and order)  राखण्यासाठी प्रयत्नरत होते व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

हेही वाचा