
केपे : गोव्यातील (Goa) कोणीमळ, बाळ्ळी (Ballim) येथे नदीत पोहोण्यासाठी (Swimming) गेलेल्या नितीन गावकर (२३ वर्षे) या युवकाचे दुर्दैवी निधन झाले. नदीत उडी टाकल्यावर त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्कीय महाविद्यालय (गोमेकॉ) (GMC) रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
यासंदर्भात कुंकळ्ळी पोलिसांनी (Cuncolim Police) सांगितले की, नदीत उडी टाकल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या युवकाला प्रथम बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर गोमेकॉत नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाचा निधन झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात अधिक तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदेश भोसले करीत आहेत.