रेड्यांच्या मालकाला वाळपई न्यायालयाचा दणका

केरी येथे २.१० लाखांचे गुरांचे मांस जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
रेड्यांच्या मालकाला वाळपई न्यायालयाचा दणका

पणजी : गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना वाळपई (Valpoi) प्रथम वर्ग न्यायालयाने (Court) जोरदार दणका दिला. केरी–सत्तरी (Sattari)  येथून बेकायदेशीररित्या वाहतूक करून नेण्यात येत असलेले दोन रेडे मालकाच्या ताब्यात देण्यास वाळपई प्रथम वर्ग न्यायालयाने आज शुक्रवारी नकार दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार खटला निकाली निघेपर्यंत हे दोन्ही रेडे नाणूस–सत्तरी येथील गोशाळेच्या ताब्यात राहणार आहेत. या निर्णयामुळे सत्तरी तालुक्यातील गोप्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. न्यायालयात नाणूस गोशाळेची बाजू अ‍ॅड. शिवाजी देसाई यांनी मांडली.

केरी येथे २.१० लाखांचे गुरांचे मांस जप्त 

दरम्यान, केरी, वाळपई येथे पोलिसांनी एका बोलेरो गाडीतून २.१० लाख रुपये किंमतीचे ७५० किलो गुरांचे मांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी बोलेरोही जप्त केली आहे. वाहन चालक सादिक नाईकवाडी (बेळगाव, कर्नाटक) (Belagavi, Karnataka) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संस्थेच्या कलम ३२५ आणि गोवा प्राणी प्रतिबंधक कायदा कलम ८ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. 

हेही वाचा