उंदीर वाढले; बंदोबस्त करण्यासाठी असणार अर्थसंकल्पात तरतूद : वीजमंत्री ढवळीकर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
47 mins ago
उंदीर वाढले; बंदोबस्त करण्यासाठी असणार अर्थसंकल्पात तरतूद : वीजमंत्री ढवळीकर

पणजी : उंदरांची संख्या सर्वत्र खूप वाढली आहे. यावर्षी त्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.  पणजीतील (Panjim)  वीज खात्याच्या (Electricity Department)  कार्यालयातही खूप  उंदीर झाले आहेत. बाहेरून हे  उंदीर आत येत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget) तरतूद असणार असल्याची माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. 

पर्वरीतील (Porvorim) विधानसभा (Assembly) आवारात पत्रकारांनी वाढत्या उंदरांच्या संख्येविषयी व वीज कार्यालयातही खूप उंदीर (Mouse) झाले असल्यासंदर्भात विचारले असता; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वरील माहिती दिली. मंत्री ढवळीकर गालातल्या गालात हसत म्हणाले की, सर्वत्र  उंदीर खूप झाले आहेत व ते कुरतरत आहेत. यावर्षी त्यांचा बंदोबस्त केला जाणार. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद असणार आहे. 

पणजी शहरात तर खूप उंदीर झाले आहेत. पणजीतील वीज कार्यालयात बाहेरून उंदीर आत येऊन त्रास देत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आपण वीज खात्याच्या मुख्य अभियंत्याशी बोलणी केली आहे. काल गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता आपण पणजीतील वीज कार्यालयात होतो. त्यावेळी आपणही बाहेरून उंदीर आत कसे येतात ते पाहिले आहे. मुख्य दरवाजापाशी त्यासाठी काही तरी व्यवस्था करावी लागणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.  

हेही वाचा