श्री लइराई देवीच्या धोंडगणांसाठी १५ मार्चला बैठक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
54 mins ago
श्री लइराई देवीच्या धोंडगणांसाठी १५ मार्चला बैठक

पणजी : गोव्यातील (Goa) शिरगाव (Shirgao) येथील श्री लइराई (Shri Lairai Temple) देवीची जत्रा २१ एप्र‌िल रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्री लइराई देवीच्या समस्त धोंडगणांना जत्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी समितीच्या वतीने रविवार दिनांक १५ मार्च रोजी संध्याकाळी ३.३० वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानच्या सभागृहात ही बैठक होणार असून, सर्व धोंडगणांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन श्री लइराई संस्थान समिती तर्फे करण्यात आले आहे. 


दरम्यान, जत्रेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.   

हेही वाचा