छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत काय कारवाई केली? उच्च न्यायालयाचा प्रशासनाला सवाल!

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या जागेतील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद : पुढील सुनावणी १० मार्च रोजी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत काय कारवाई केली? उच्च न्यायालयाचा प्रशासनाला सवाल!

पणजी: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (MPA) मालकीच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी निर्माण झालेला कायदेशीर वाद आता अधिक गडद झाला आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक तसेच मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत. या प्रकरणी प्रशासनाने आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली, याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुरगाव बंदर प्राधिकरणाने आपल्या जमिनीवर अनधिकृतपणे पुतळा उभारल्याची तक्रार मुरगाव पोलीस तसेच पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे नोंदवली होती. सडा येथील या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात अद्याप संबंधितांनी कोणतीही कारवाई केली नाही तसेच येथे अजूनही बांधकाम सुरूच असल्याने प्राधिकरणाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. प्राधिकरणाच्या तक्रारीनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कोणती पावले उचलली, याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने पुढील सुनावणी १० मार्च रोजी निश्चित केली आहे. 


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा