पणजी महापालिकेत बाबूशकडून २० टक्केच नव्या चेहऱ्यांना संधी!

५० टक्क्यांचा होता दावा : भाजप पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th February, 10:37 pm
पणजी महापालिकेत बाबूशकडून २० टक्केच नव्या चेहऱ्यांना संधी!

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात समर्थित भाजप पॅनलच्या उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा केली असताना प्रत्यक्षात मात्र केवळ २० टक्के नवे चेहरे रिंगणात उतरवण्यात आले आहेत.

येत्या ११ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांचा भाजप समर्थित पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांचा ‘आमी पणजेकार’ पॅनल यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

भाजप समर्थित पॅनलचे उमेदवार (प्रभाग १ ते ३०)

प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव प्रवर्ग / आरक्षण
प्रभाग १युतिका जांबावलीकरएसटी महिला
प्रभाग २कॅरोलिना पोओबीसी महिला
प्रभाग ३मार्गारीटा फर्नांडिसओबीसी महिला
प्रभाग ४रोहित मोन्सेरातसर्वसामान्य
प्रभाग ५किशोर शास्त्रीसर्वसामान्य
प्रभाग ६सिल्वेस्टर बेंतो लॉरेनाओबीसी
प्रभाग ७संजीव देसाईसर्वसामान्य
प्रभाग ८करीना शिरोडकरओबीसी महिला
प्रभाग ९मखिजा कबीर फिलीप पिंटोसर्वसामान्य
प्रभाग १०प्रसाद आमोणकरसर्वसामान्य
प्रभाग ११तुकाराम चिन्ननावरसर्वसामान्य
प्रभाग १२वर्षा शेट्येसर्वसामान्य
प्रभाग १३उदय मडकईकरसर्वसामान्य
प्रभाग १४प्रजोत वायंगणकरओबीसी
प्रभाग १५शायनी चोपडेकरओबीसी
प्रभाग १६अस्मिता केरकरमहिला
प्रभाग १७जॉर्ज डेनीस एडवर्ड फ्रांसिससर्वसामान्य
प्रभाग १८रामदास शिरोडकरसर्वसामान्य
प्रभाग १९निकीता नाईकमहिला
प्रभाग २०शुभम चोडणकरसर्वसामान्य
प्रभाग २१मनीषा मणेकरओबीसी
प्रभाग २२दीक्षा माईणकरमहिला
प्रभाग २३विद्या गडकरमहिला
प्रभाग २४करण पारेखसर्वसामान्य
प्रभाग २५कीर्ती साखळकरमहिला
प्रभाग २६वसंत आगशीकरसर्वसामान्य
प्रभाग २७विठ्ठल चोपडेकरओबीसी
प्रभाग २८रुपेश हळर्णकरसर्वसामान्य
प्रभाग २९सँड्रा डीकुन्हामहिला
प्रभाग ३०फर्नांडिस मारीयासर्वसामान्य

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे

महानगरपालिकेच्या या रणधुमाळीत भाजपने जुन्या ३० पैकी ८० टक्के उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. याव्यतिरिक्त प्रभाग ९ मधून सुरेंद्र फुर्तादो यांनीही अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे.

तपशील तारीख
अर्ज स्वीकारण्याची सुरुवात १७ फेब्रुवारी २०२६
मतदानाची तारीख ११ मार्च २०२६
#PanajiCCP #Election2026 #BabushMonserrate #UtpalParrikar #PanajiNews #GoaPolitics