
पणजी : गोव्यातील (Goa) सोलये, काकोडा, कुडचडे (Curchorem) येथे रस्त्यावर अचानक कुत्रा (Dog) आडवा आल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात (Accident) उत्तम गावकर (६४ वर्षे) हे मृत्यू पावले.
१९ फेब्रुवारी रोजी स्कूटरवरून (Scooter) जात असताना सोलये येथे हा अपघात घडला. उत्तम गावकर यांची मुलगी स्कूटर चालवत होती तर ते मागे बसले होते. अचानक कुत्रा आडवा आल्याने नियंत्रण सुटले व खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने; त्यांना प्रथम काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर जिल्हा इस्पीतळात नेण्यात आले व नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पीतळात नेण्यात आले. याठिकाणी त्यांचे निधन झाले.
भटकी गुरे, कुत्रे यांच्यामुळे अपघात
दरम्यान; रस्त्यांवरील भटकी गुरे, कुत्रे यांच्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. त्यात लोकांचे बळी जात आहेत तर काहीजण गंभीर जखमी होत असतात. त्यामुळे भटकी गुरे, कुत्रे यांचा स्थानिक पंचायती, नगरपालिका यांनी बंदोबस्त करावा; अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.