'एससीईआरटी'चे परिपत्रक : ११ मार्च रोजी होणारा पेपर आता ४ मार्चला

पणजी : पणजी महानगरपालिका निवडणुकीमुळे 'गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने' (जीएससीईआरटी) पाचवी ते आठवीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ११ मार्च रोजी होणारा पेपर आता ४ मार्च रोजी घेतला जाईल. इतर वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. पणजी महानगरपालिकेच्या मतदानामुळे ११ मार्चला परीक्षा होणार नाही, असे परिपत्रक 'एससीईआरटी'ने जारी केले आहे.
पाचवी ते आठवीची परीक्षा आता ४ मार्चपासून सुरू होईल, जी आधी ५ मार्चला सुरू होणार होती. पहिल्या सत्राप्रमाणेच दुसऱ्या सत्राच्या प्रश्नपत्रिका देखील जीएससीईआरटीद्वारेच काढल्या जातील.
- परीक्षेचा कालावधी : ४ मार्च २०२६ ते १२ मार्च २०२६.
- वेळेत बदल : सकाळी ८.३० ऐवजी आता सकाळी ९.०० वाजता पेपर सुरू होईल.
- परीक्षा समाप्ती : सर्व परीक्षा १२ मार्चला संपतील.
२३ फेब्रुवारीपासून शाळांना प्रश्नपत्रिकांचे वाटप सुरू होईल. परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. जर २८ फेब्रुवारीपर्यंत प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत, तर मुख्याध्यापकांनी 'एससीईआरटी'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची पाकिटे उघडता येणार नाहीत; पेपरच्या दिवशी परीक्षा नियंत्रकाच्या स्वाक्षरीनंतरच ती उघडली जावीत, असे मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत.