
नवी दिल्ली : रेल्वे भरती विभागाने (Railway Recruitment Cell) पश्चिम रेल्वेत (Western Railway) भरतीची अधिसूचना जारी केली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून; इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. संबंधित प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
शैक्षणिक पात्रता
किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण
एनसीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा
किमान वय : १५ वर्षे
कमाल वय : २४ वर्षे
एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे सवलत
ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे सवलत
पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १० वर्षे सवलत
अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी, इडब्ल्यूएस : १०० रुपये
एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी महिला उमेदवार : शुल्क मुक्त
निवड प्रक्रिया
शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
कागदपत्रांची पडताळणी
विद्यावेतन
रेल्वे बोर्डाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
www.rrc-wr.comया संकेतस्थळाला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
नोंदणीनंतर लॉग-इन करून अर्ज पूर्ण करा.
लागू असल्यास शुल्क भरा.
अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.