
वास्को : सांकवाळ येथील सेंट जॅसिंटो बेट परिसरात दोन कारमध्ये (car) अपघात (Accident) झाला. एका कारमध्ये अडकलेल्या चालकाला वास्को व वेर्णा अग्निशामक दलाने बाहेर काढले.
किया कार वास्को (Vasco) येथून कुठ्ठाळी (Cortalim) येथे जात होती. सेंट जॅसिंटो बेट परिसरात पोहोचली असता, पुढून येत असलेल्या कारला धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारच्या पुढील भागाची बरीच हानी झाला. अपघातात एका कारमध्ये अडकलेल्या चालकाला वेर्णा (Verna) व वास्को अग्निशामक दलाने बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघातासंदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत.